राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांचे अर्ज दाखल, आज अर्जांची पडताळणी

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. 15) सहा जागांसाठी एकूण सात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची शुक्रवारी पडताळणी होणार असून, त्यानंतर निवडणूक बिनविरोध होणार किंवा नाही ते स्पष्ट होईल.

भाजपाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तसेच पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानुसार तिघांनी अर्ज देखील भरले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तसेच काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. जगताप यांच्या एका अर्जामुळे भाजपसह सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होऊ शकलेली नाही. अर्थात, अर्ज छाननीच्या वेळी विश्वास जगताप यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, त्यांच्या अर्जावर अनुमोदनासाठी 10 आमदारांच्या सह्या नाहीत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button