महाराष्ट्रात आता ‘भाजप-राज’, मनसे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा देणार

गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा

Raj Thackeray : उज्ज्वल भवितव्यासाठी देशाला सक्षम नेतृत्व मिळवून देण्याकरीता नरेंद्र मोदींना निवडून आणणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठींबा देणार आहोत, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मंगळवारी (ता.09) मुंबईत शिवतीर्थ मैदानावर केली.

राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “आगामी लोकसभा निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील, विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे, असे सांगितले होते. कोणती सोंगटी कुठे पडली आहे माहिती नाही. माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे ना जपान आहे. या तरुण व तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केले पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. 10 वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे.”

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, की “हिंदुत्वासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो तर त्याचा फायदा होणार आहे. या आधी देखील आम्ही शिवसेनेत असताना भाजपसोबत होतो. त्यामुळे आता जरी एकत्र आलो तर त्यात काही नवीन काही नसणार आहे.”

WhatsApp Group

Related Articles

Back to top button