Rain News : राज्यात आज देखील मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची स्थिती…!

Rain News : राज्यात कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, त्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने अतिदक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे, ज्यामुळे या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Rain News : Warning of heavy rain in the state today; Know the status of Jalgaon district…!

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात देखील जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. विजांसह मध्यम ते जोरदार सरींच्या शक्यतेमुळे काही ठिकाणी अचानक पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, कोकणातील रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अति दक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागांमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

असा आहे हवामान विभागाने व्यक्त केलेला पावसाचा अंदाज

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रायगड, पुणे, सातारा.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button