Rain News : आजही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा; जळगाव जिल्ह्याची कशी राहील स्थिती…?

Rain News : उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जळगावसह बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. अनेक ठिकाणी पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे.

Rain News : Stormy rain warning with lightning today; How will the condition of Jalgaon district be…?

यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास काहीसा उशिराने सुरू केला आहे. सोमवारी (ता. २३) वायव्य राजस्थान आणि कच्छमधून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर मंगळवारी (ता. २४) राजस्थान, गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून मोसमी वारे परतले. मात्र, त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास थबकला. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट आबू, दीसा, सुरेंद्रनगर ते जुनागडपर्यंत मोसमी वाऱ्यांची परतीची सीमा स्थिर आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि त्याच्या परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने त्या भागात अस्थिर हवामान कायम आहे. तसेच दक्षिण गुजरातपासून वायव्य बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्याचा परिणाम पावसाळी वातावरणावर होत आहे. राज्यात सध्या ढगाळ हवामानामुळे तापमानात घट दिसून येत आहे, ज्यामुळे उन्हाचा चटका काही प्रमाणात कमी झाला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button