Rain News : उत्तर महाराष्ट्रात आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; जळगाव जिल्ह्याची कशी आहे स्थिती ?

Rain News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत असल्याने महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सततचा पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आज (ता.०३) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Rain News : Rain warning with lightning in North Maharashtra today; How is the condition of Jalgaon district?

महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय झाले आहे, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत राहणार आहे. गुजरातपासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पावसाच्या प्रमाणावर आणि वितरणावर परिणाम करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर कमी तर काही ठिकाणी जोरदार सरींचा अनुभव येऊ शकतो. अरबी समुद्रातील ‘असना’ चक्रीवादळ आता ओमानकडे सरकत असून त्याची तीव्रता कमी होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या चक्रीवादळामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु पूर्व विदर्भ आणि तेलंगणा परिसरात एक नवीन तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे या भागात काही काळासाठी अस्थिर हवामान आणि पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने व्यक्त केलेला जिल्हानिहाय पावसाचा अंदाज

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : पुणे, सातारा, अमरावती.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button