Rain News : आजही विजांसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची स्थिती…!

Rain News : राज्यात पावसाचा जोर आता कमी झालेला असला तरी हवामान विभागाने आज शुक्रवारी (ता.३०) बऱ्याच ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाला पोषक वातावरण कायम असल्याने अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. त्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

Rain News : Meteorological department predicted rain with lightning today; Know the status of Jalgaon district…!

मॉन्सूनच्या हंगामात राज्यातील हवामानात महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरातमधील वादळी प्रणाली, ज्याला डीप डिप्रेशन म्हणतात, त्यापासून सुरू होत आहे. आता तो उदयपूर, शिवपूरी, सिंधी, अंबिकापूर, पूरी आणि मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या केंद्रापर्यंत विस्तारित आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेच्या हालचालींमध्ये बदल झाले आहेत. याचसोबत दक्षिण गुजरातपासून मध्य केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर असा हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या हवामान बदलांमुळे राज्यात पावसाची उघडीप निर्माण झाली आहे. तसेच उन्हाच्या तीव्रतेत आणि उकाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. येत्या दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, ती दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे झेपावताना दिसून आली आहे.

हवामान विभागाने जिल्हानिहाय व्यक्त केलेला पावसाचा अंदाज (ता.३०)

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : चंद्रपूर, गडचिरोली.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : जळगाव, नगर, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button