Rain News : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात आजही जोरदार पावसाचा इशारा…!

Rain News : राज्यात कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज सोमवारी २६ ऑगस्ट रोजी देखील हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Rain News : Jalgaon, Dhule, Nashik districts of North Maharashtra are warning of heavy rain today…!

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) जारी केला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. उर्वरित कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरीही अचानकपणे जोरदार सरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या बदलत्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

जिल्हानिहाय असा आहे पावसाचा अंदाज

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, पालघर, धुळे, जळगाव.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button