Rain News : जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता !
Rain News : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला असल्याचे चित्र दिसत आहे. तरीही काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने आज रविवारी राज्यातील १३ जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Rain News: Yellow alert of rain in many districts of the state today; Know the status of Jalgaon!
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे आणि रायगडसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे या भागांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. रविवारी धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाची शक्यता आहे. तळ कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, आणि वैभववाडी या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे, त्यामुळे प्रशासनाने मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.