Rain Alert : खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये आजपासून चार दिवस जोरदार पावसाचा इशारा

Rain Alert : मॉन्सून सक्रीय झाल्यापासून राज्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पावसाची हजेरी लागत आहे. पुरेशा पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे मिटली आहे. दरम्यान, आज रविवारपासून पुढचे चार दिवस खान्देशातील तिन्ही जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Rain Alert
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर जिल्हे तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, हिंगोली, लातूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

उत्तर गुजरात परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. महाराष्ट्रापासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे झुकलेला असून, राजस्थानच्या श्री गंगानगरपासून हिस्सार, दिल्ली, बाराबंकी, देहरी, असनसोल ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत तो सक्रिय आहे. त्यामुळेच सर्वदूर पावसाची हजेरी लागत आहे. या पावसामुळे सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button