एक्स्प्रेसला मालगाडीची जोरदार धडक; 15 प्रवाशी ठार, 60 जण जखमी !

जळगाव टुडे । मालगाडीने भरधाव एक्स्प्रेसला मागून जोरदार धडक दिल्याने सुमारे 15 प्रवाशांचा मृत्यू होऊन 60 जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी (ता.17) घडली. मालगाडीच्या चालकाला पावसामुळे सिग्नल न दिसल्याने घडलेला हा भीषण अपघात पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये घडला आहे. अपघातस्थळी मदतकार्याला वेग देण्यात आला असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ( Railway Accident )

दरम्यान, रेल्वे अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे दिल्लीहून दार्जिलिंगला तातडीने रवाना झाले आहेत. कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जात होती. लाल सिग्नलमुळे एक्स्प्रेस ट्रेन सिलीगुडीतील रंगपानी स्टेशनजवळ रुईधासा येथे थांबलेली होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या मालगाडीने तिला जोरदार धडक दिली. त्यामुळे एक्स्प्रेसचा एक डबा मालगाडीच्या इंजिनवर चढून हवेत लटकला. याशिवाय इतर दोन डबे रुळावरून घसरले.

पॅसेंजर रेल्वेला शेवटी दोन पार्सल आणि एक एसएलआर कोच जोडण्यात आला होता. सुदैवाने त्यात कोणतेही प्रवासी नव्हते. परंतु, दोन लोको पायलट आणि एका गार्डसह काही जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेच्या पाच डब्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. चाचणीनंतर रेल्वे सियालदहला रवाना केली जाणार असून रेल्वे सेवा एकेरी लाईनवर सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पूर्व रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button