पोलिस शिपाई पद भरतीसाठी अर्ज करण्यास 15 एप्रिलपर्यंत मिळाली मुदतवाढ
Police Bharti : पोलिस शिपाई संवर्गातील पदांसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे SEBC प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अंतिम दिनांकापुर्वी तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास प्रमाणपत्र अर्जाची पोच पावतीसह अर्ज सादर करावा. मात्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे, अशी माहिती राजकुमार व्हटकर (अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांनी दिली आहे.
पोलिस शिपाई, पोलिस शिपाई-वाहन चालक, पोलिस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई या पदांसाठी 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतील. पोलिस बॅन्डस्मन पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. एकूण सुमारे 17 हजार 311 जागांसाठी सदरची पोलिस भरती होणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.