राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बुधवारी जमा होणार प्रत्येकी 6 हजार रूपये

देशभर बुधवारी पीएम किसान उत्सव दिवस साजरा होणार

PM Kisan : पीएम किसान योजनेंतर्गत 2000 रूपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून 4000 रूपये, असे एकुण 6000 रूपये राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात बुधवारी (ता. 28) थेट जमा करण्यात येणार आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माहे डिसेंबर 2023 ते मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार (28 फेब्रुवारी) रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. त्यानिमित्ताने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रित वितरीत करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आदी उपस्थित राहणार आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button