Pikvima Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे ५२३ कोटी रूपयांची पिकविमा रक्कम मंजूर

Pikvima Yojana : प्रधानमंत्री पिकविमा योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४ लक्ष ५६ हजार १२८ शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला होता. दरम्यान, भरपाईसाठी ३ लक्ष ८७ हजार ९७३ शेतकरी पात्र ठरले असून, त्यासाठी ओरिएंटल इंडीया इन्शुरन्स कंपनीमार्फत तब्बल ५२३ कोटी २८ लक्ष रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pikvima Yojana : Good news for farmers; 523 crore fund approved for 4 lakh crop insurance holders in Jalgaon district
जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीजन ऍडव्हसिटी २५ टक्के) अग्रीमपोटी ८२ कोटी ५२ लाखांचा निधी यापूर्वीच वितरित झालेला आहे. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती खरीप हंगाम- २०२३ करिता जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना ५० कोटी ११ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. उत्पत्रावर आधारीत खरीप हंगाम २०२३ करीता नुकतीच मंजुर झालेली ५२३ कोटी इतकी रक्कम ही कंपनीमार्फत वर्ग करण्याची कारवाई सुरू असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

तालुकानिहाय शेतकरी संख्या, मंजूर विमा रक्कम
अमळनेर- ५५ हजार ८२४ शेतकऱ्यांसाठी ३६ कोटी १० लक्ष रूपये, भडगाव- २३ हजार ७७१ शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ८४ लक्ष रूपये, भुसावळ- ८ हजार ४७६ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ५५ लक्ष रूपये, बोदवड- १२ हजार ९५९ शेतकऱ्यांसाठी १७ कोटी ८४ लक्ष रूपये, चाळीसगाव- ५७ हजार ५८९ शेतकऱ्यांसाठी ११२ कोटी रूपये, चोपडा- ३१ हजार ५२६ शेतकऱ्यांसाठी ५१ कोटी २१ लक्ष रूपये, धरणगाव- १० हजार ५३३ शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी ९५ लक्ष रूपये, एरंडोल- २३ हजार ६७६ शेतकऱ्यांसाठी १५ कोटी २१ लक्ष रूपये, जळगाव- १२ हजार ५५८ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९० लक्ष रूपये, जामनेर- ५७ हजार ९६४ शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ४ लक्ष रूपये, मुक्ताईनगर- २ हजार शेतकऱ्यांसाठी ९ लक्ष ५१ हजार रूपये, पाचोरा- ४६ हजार ११६ शेतकऱ्यांसाठी ९३ कोटी ५८ लक्ष रूपये, पारोळा- ४० हजार ४० शेतकऱ्यांसाठी २० कोटी ९४ लक्ष रूपये, रावेर- ८९० शेतकऱ्यांसाठी ५० लक्ष ८७ हजार रूपये, यावल- ७ हजार ५१ शेतकऱ्यांसाठी ५ कोटी ९१ लक्ष रूपये.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button