मोदींची खुर्ची धोक्यात….नितीन गडकरी 2026 नंतर कधीही होऊ शकतात भारताचे पंतप्रधान ?

कुंडलीत राजकीय बहुमानाचा आहे योग

जळगाव टुडे । नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नऊ वर्षांपेक्षा अधिक काळ रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री राहिलेले केंद्रीय मंत्री असून, त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक महामार्ग व उड्डाणपूल आकारास देखील आले आहेत. देशाच्या राजकारणात आतापर्यंत जेवढे काही अजातशत्रू होऊन गेले, त्यात गडकरींचा समावेश आवर्जून केला जातो. हल्ली राजकारणाची पद्धत बदललेली असली तरी राजकारणाच्या पलिकडे मैत्री जपणारा आणि मैत्रीत राजकारण न आणणारा नेता म्हणून नितीन गडकरींकडे पाहिले जाते. असा हा नेता सन 2026 नंतर कधीही देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो, अशी भविष्यवाणी ज्योतिषांनी केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांची नावे मोठ्या आदराने घेतली जातात. त्यातल्या त्यात मोदी आणि नितीन गडकरी हे दोघे कायम चर्चेत असतात. मोदींचे म्हणाल तर त्यांचे आणि देशातील विरोधी पक्षांचे सहसा कधी पटल्याचे पाहण्यात आलेले नाही. मात्र, नितीन गडकरी हे विरोधी पक्षांना नेहमीच जवळचे आणि आपले वाटत आले आहेत. त्यांचे सहसा कोणी राजकीय दुष्मन देखील नाहीत. त्यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी हे भाजपामध्ये सध्या सर्वांच्या आवडीचे असले तरी नितीन गडकरींना सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांकडून कायमच आदराचे स्थान मिळाले आहे. भाजपामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर बहुधा नितीन गडकरी हे एकमेव अजातशत्रू असावे.

म्हणून नितीन गडकरी मानले जातात पंतप्रधानपदाचे सर्वात प्रबळ दावेदार…
ज्योतीष शास्त्राच्या मते राज्य कारभार चालविण्यासाठी मंगळाचे वर्चस्व मोठे मानले जाते. देशाच्या हिताचे राजकारण जर बुद्धीच्या जोरावर केले तर त्यातून नक्कीच यश प्राप्त होते. शनीचे राजकारण हे हट्टीपणाचे व आततायीपणाचे असते. अशा प्रभावाखाली सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय हे पुढे जाऊन वादग्रस्त ठरू शकतात. यावेळी भाजपाला नितीन गडकरींची निश्चितच मोठी मदत मिळू शकणार आहे. गडकरींचा बुध मंगळ त्रिएकादश योगातून तयार होणारा राजयोग पुढील काळातही उत्तम नेतृत्व निर्माण करेल. तसेच अडचणीच्या काळात आपल्या चतुरस्त्र डावांनी देशातील लोकशाहीला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारून होणारा विरोध संपवून टाकेल. आश्वासने नकोत पूर्तता करू, हा त्यांचा कानमंत्र पुढील काळातही यशस्वी ठरेल. राजकीय आयुष्यात पुरेसे पर्याय असावेत. आंधळेपणाने केलेले देशाचे राजकारण विनाशाकडे नेईल याची पुरेपूर जाणीव असणारी नितीन गडकरी यांच्यासाठी व्यक्ती भावी काळातील नेतृत्व घडवेल, असे ज्योतिषांनी म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button