Ncp Sharadchandra Pawar : जळगावमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाकडे पंतप्रधानांचे वेधले लक्ष…!

Ncp Sharadchandra Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत होण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने आज जळगावमध्ये निदर्शने केली. पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी तिलोत्तमा पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकात पार पडलेल्या या लक्षवेधी आंदोलनात पदाधिकाऱ्यांसह बरेच कार्यकर्ते सहभागी झाली होते.

Ncp Sharadchandra Pawar: Sharadchandra Pawar Nationalist Congress drew PM’s attention to Padalsare project on Tapi river…!

निम्न तापी पाडळसरे धरण गेल्या दोन दशकांपासून लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रखडलेले आहे. अमळनेरसह तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व उद्योग व्यवसायासाठी संजीवनी ठरू शकणाऱ्या सदर प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा म्हणून सातत्याने जन आंदोलन समिती पाठपुरावा करीत आहे. पंतप्रधान जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना समितीला जळगाव येथे येण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. त्यामुळे पंतप्रधानांचे तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी तिलोत्तमा पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोरच निदर्शने केली. धरण झालेच पाहिजे, पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केलाच पाहिजे, असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलिस प्रशासनाला कुठलीही सूचना नसल्याने अनपेक्षित घडलेल्या या आंदोलनाने महिला नेत्या तिलाेत्तमा पाटील व सहकाऱ्यांनी या प्रश्नाला जळगावच्या पंतप्रधान दौऱ्यात वाचा फोडली. दरम्यान, सदर आंदोलन सुरू असतानाच पोलीस आकाशवाणी चौकात पोहोचले. सर्व आंदोलनकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बसवून ठेवून सभोवती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

आंदोलकांजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन होते. तिलोत्तमा पाटील यांच्यासह आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. प्रदेश पदाधिकारी तिलोत्तमा पाटील यांच्यासह शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, महिला आघाडी शहर अध्यक्षा मंगला पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, वाय.एस.महाजन, संजय चव्हाण, डॉ.अरुण पाटील, कविता पवार, कृष्णा पाटील, शरद पाटील, रविंद्र पाटील, हिरालाल पाटील, शुभाष पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button