Ncp Sharadchandra Pawar : जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष निवडण्याविषयीची मोठी अपडेट समोर !

Ncp Sharadchandra Pawar : लोकसभेच्या निवडणुकीतील पराभानंतर जळगाव जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जिल्हा कार्यकारीणी मागे बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुलाखती देखील घेतल्या होत्या. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आता कोणाला मिळते, त्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले असताना, त्यासंदर्भात मोठी अपडेट आता समोर आली आहे.

Ncp Sharadchandra Pawar
शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समन्वयक म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख यांना जळगावमध्ये पाठवले होते. त्यानुसार श्री.देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष व अन्य पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पार पाडली होती. त्याबाबतचा अहवाल त्यांनी प्रदेश कार्यालयाकडे सोपविल्यानंतर आता नूतन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा तेवढी बाकी आहे.

दरम्यान, जळगावच्या नवीन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा पुढील आठवड्यात साधारण सोमवारनंतर होण्याची शक्यता आहे. मोठा जिल्हा असल्याने सर्व तालुक्यांना न्याय देणे शक्य व्हावे म्हणून रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष सुद्धा नियुक्त केले जाऊ शकतात, असे वक्तव्य शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी केले आहे.

याशिवाय पक्षाला पूर्णवेळ देऊ शकणारा तसेच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा आणि पक्ष बांधणीची क्षमता असलेल्या चेहऱ्याला जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यावर पक्षाचा भर आहे. त्यामुळे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सादर केलेल्या अहवालानुसार पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्षपदाची घोषणा होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे राज्य निरीक्षक शेखर यांनीही दिली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button