मोठी बातमी…निवडणूक आयोगाची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्यता !
जळगाव टुडे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची महत्वपूर्ण सुनावणी लवकरच होणार आहे. सदरचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार? त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष देखील लागले आहे. तत्पूर्वीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे कलम २९ ब नुसार या पक्षाला आता देणगी सुद्धा स्वीकारता येणार आहे. ( Ncp Sharadchandra Pawar )
Ncp Sharadchandra Pawar
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा शरद पवार गटाला मिळाला आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिल्यामुळे कलम २९ ब नुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. येत्या १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. तो निर्णय सुद्धा कोणाच्या बाजूने जाणार? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे संख्याबळाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? त्याबाबतची उत्कंठा सर्वांना लागली आहे.
Ncp Sharadchandra Pawar
दरम्यान, “शरद पवारांचा पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतला गेला ते पाहता जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. आमच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते, पण आम्हाला देणगी स्वरुपात रक्कम घेण्याचा अधिकार दिलेला नव्हता. तसेच कर लाभ देखील मिळत नव्हते. आता आमची विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.