Ncp Sharadchandra Pawar : धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या !
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन
Ncp Sharadchandra Pawar : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ही स्थिती लक्षात घेता अती पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मंगळवारी (ता.०६) करण्यात आली.
Ncp Sharadchandra Pawar: Pay immediate compensation to the farmers by making Panchnama of crop damage in Dharangaon taluka!
माजी मंत्री व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्याचे नेते गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली धरणगावच्या तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी तहसील कार्यालाच्या बाहेर निदर्शने देखील करण्यात आली. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, ज्येष्ठ नेते मोहन नाना पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एन.डी.पाटील, संचालक दिलीपअण्णा धनगर, रंगराव पाटील, रघुनाथ पाटील तसेच युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, त्याचप्रमाणे डॉ.नितीन पाटील, कैलास मराठे, नारायण चौधरी, साईनाथ पाटील, दिनानाथ चव्हाण, उमेश चव्हाण, गजानन मराठे, घनश्याम पाटील, शरद पाटील (सतखेडा), प्रदीप पाटील (अंजनविहीरे), मोठाभाऊ पाटील (रोटवद), गजानन पाटील (रोटवद), दिलीप पाटील (साळवा), भाऊसाहेब पाटील (साकरे), उत्तम भदाणे (बिलखेडा), किशोर भदाणे (बिलखेडा), भूषण पाटील (कल्याणे होळ), रवींद्र महाजन (धानोरे) आदी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचा देखील लाभ मिळवून द्या
पावसाची उघडीप न मिळाल्याने कपाशी, मका, ज्वारी, उडीद, मूग, तूर, तीळ आदी पिकांवर कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असली तरी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने खरीप पिके हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहेत. विशेषतः सोनवद व साळवा गटात जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण धरणगाव तालुक्यातील खरीप पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे व भरपाई देण्याची व्यवस्था करावी. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांनाही निकषानुसार नुकसान भरपाई मिळावी, असेही तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.