Ncp Sharadchandra Pawar : धरणगाव तालुक्यात वारं फिरलं; तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाढला ओढा !

Ncp Sharadchandra Pawar : विधानसभा निवडणुकीचे वेध लागत नाही तेवढ्यातच जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात वारं फिरल्याची प्रचिती येऊ लागली आहे. विशेषतः तरूणाई शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या १० वर्षांच्या कालखंडात विकासापासून वंचित राहिलेल्या बऱ्याच गावांमधील तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यास सुरूवात देखील केली आहे.

Ncp Sharadchandra Pawar : The wind turned in Dharangaon taluka; Sharad Chandra Pawar pull the youth to NCP!

विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी फायनल केली आहे. त्यामुळे जळगाव व धरणगाव तालुक्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या जुन्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विधानसभेची निवडणूक अद्याप घोषित झालेली नसली तरी गावागावात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रीय सुद्धा झाले आहेत. त्यात आता तरूण पिढीही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी जुळण्यासाठी आतूर झाली आहे. अनेक तरूणांनी थेट प्रवेश करून पक्ष कार्यासाठी समर्पित भावनेने झोकून देण्याचा संकल्प देखील केलेला आहे.

बोरगावच्या ‘या’ तरूणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश

दरम्यान, बोरगाव (ता.धरणगाव) येथील बऱ्याच तरूणांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपअण्णा धनगर यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यात भूषण सूर्यवंशी, अशोक धोंडू मराठे, पंकज हरी मराठे, जितेंद्र ज्ञानेश्वर मराठे, अमोल अरूण पाटील, नामदेव देविदास मराठे, वाल्मिक देवराम मराठे, पुरूषोत्तम नारायण पाटील, रवींद्र त्र्यंबक मराठे, गणेश बबन मराठे, रवींद्र सुपडू मराठे, संदीप दगा पाटील, गोविंद सुनील पाटील, मनोज धोंडू पाटील, अमोल मुरलीधर पाटील आदींचा समावेश होता. माजी मंत्री श्री.देवकर यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button