Ncp Sharadchandra Pawar : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस; जळगाव जिल्हाध्यक्षपदावर चाळीसगाव तालुक्याचे वर्चस्व !
दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील नवे अध्यक्ष
Ncp Sharadchandra Pawar : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर अखेर चाळीसगावने वर्चस्व सिद्ध केले आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक व चाळीसगाव तालुक्याचे रहिवासी प्रमोद पांडुरंग पाटील यांची त्या पदावर वर्णी लागली आहे. याशिवाय लोकसभा मतदारसंघानुसार दोन कार्याध्यक्ष आणि जळगाव शहरासाठी एक अध्यक्ष व दोन कार्याध्यक्षांची निवड जाहीर झाली आहे. त्यासंदर्भात नियुक्ती पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी काढले आहे.
Ncp Sharadchandra Pawar: Sharadchandra Pawar NCP Jalgaon District President dominated Chalisgaon!
लोकसभेच्या निवडणुकीत जळगाव तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात अपेक्षित यश न मिळाल्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वी जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारीणी बरखास्त केली होती. त्यानंतर पक्षाचे समन्वयक माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष व अन्य पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या होत्या. दरम्यानच्या काळात जळगावमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. त्याठिकाणी नवीन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तेव्हाही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी उत्कंठा निर्माण झाली होती. अखेर आज शनिवारी (ता.०३) त्यासंदर्भात पत्र प्रदेश कार्यालयाने काढले आणि नवीन जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.
अशी आहेत नवीन पदाधिकाऱ्यांची नावे
■ जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष- प्रमोद पांडुरंग पाटील
■ जळगाव लोकसभा कार्याध्यक्ष- शालीग्राम ओंकार मालकर
■ रावेर लोकसभा कार्याध्यक्ष- राजेंद्र विश्वनाथ चौधरी
■ जळगाव शहर अध्यक्ष- एजाज गफ्फार मलीक
■ जळगाव शहर कार्याध्यक्ष- संग्राम सुयर्वंशी
■ जळगाव शहर कार्याध्यक्ष- सचिन देविदास पाटील