Ncp Sharadchandra Pawar : शरद पवारांनी सडक्या आंब्याची उपाधी नेमकी दिली कोणाला ? ‘अजित पवारांना…’ ?

Ncp Sharadchandra Pawar : “काही लोकांनी चूक केली आहे, पण आता ते पक्षात परत येऊ इच्छित आहेत. यापैकी जे चांगले आहेत त्यांना संधी दिली जाईल. मात्र, एका खराब आंब्यामुळे संपूर्ण आडी खराब होऊ नये, याची मी खबरदारी घेत आहे”, असे शरद पवारांनी शनिवारी पक्षाच्या मेळाव्यात सांगितले. सडका आंबा कोण आहे, हे शरद पवारांनी स्पष्ट केले नाही. पण, त्यांचा इशारा अजितदादांकडे असल्याचे दिसले.

Ncp Sharadchandra Pawar: Who exactly did Sharad Pawar give the title of Bad Mango? To Ajit Pawar…?
राष्ट्रवादी भवनात पक्षाचा मेळावा आणि पाथ्रीचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट निशाणा साधला. मेळाव्यास उपस्थित कार्यकर्तेही म्हणाले की, जे गेले त्यांना आता परत घेऊ नका. यावेळी एकाने आमदार सतीश चव्हाण यांचेही नाव घेतले होते. त्यानंतर शरद पवार यांनी एक सडका आंबा आडीत असला तर संपूर्ण आडी तो खराब करतो. त्यामुळे सडक्या आंब्यांना आता प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

“स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांचा काहीच सहभाग नव्हता असे लोक महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यावर टीका करतात. सध्या नवीन फसव्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. पंतप्रधानांनी देश एकसंघ ठेवणे आवश्यक असते, परंतु गेल्या दहा वर्षांत जाती-धर्मांत तेढ निर्माण केली गेली आहे. धर्माच्या नावाने भांडण लावली जात आहेत. देशाचे नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात गेले आहे. संविधानावर हल्ला होत आहे. कामगार, नोकरदार, शेतकरी इत्यादी सर्वच त्रस्त आहेत,” असेही ज्येष्ठ नेते शरद पवार राष्ट्रवादीच्या मेळाव्यात म्हटले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button