NCP Jalgaon Gramin : धरणगाव तालुक्यातील भवरखेड्याच्या असंख्य तरूणांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश…!
NCP Jalgaon Gramin : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षात एकही उद्योग आणू शकलेले नाही. या कारणाने अनेक बेरोजगारांना रोजगारासाठी गाव सोडून मुंबई, पुणे, नाशिकची वाट धरावी लागली आहे. हे नेहमीचे चित्र बदलण्यासाठी गावागावातील अनेक युवक त्यामुळे आता झपाटले असून, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू लागले आहेत. भवरखेडा (ता.धरणगाव) येथील असंख्य युवकांनी त्याची सुरूवात देखील केली आहे.
NCP Jalgaon Gramin : Dharangaon taluka Hundreds of youth of Bhawarkheda Sharad Chandra Pawar in NCP party!
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे माजी मंत्री श्री.गुलाबराव देवकर यांनी पक्षाच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, भवरखेडा गावाचे माजी सरपंच किरणभाऊ पाटील तसेच नंदलालभाऊ पाटील, विकासभाऊ माळी, उपसरपंच खंडूभाऊ रूपचंद भिल्ल, कानळद्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘यांनी’ केला जाहीर प्रवेश
प्रशांत रमेश भदाणे, प्रदिप यशवंत पाटील, अमोल रमेश पाटील, नारायण रमेश पाटील, अधिकार एकनाथ पाटील, पंकज दीपक पाटील, श्याम सीताराम माळी, भूषण सतिलाल पाटील, दीपक यशवंत पाटील, दिनेश रवींद्र पाटील, ईश्वर गुलाब धोबी, सागर मांगो माळी, स्वामी श्यामकांत पाटील, रितेश संदिप पाटील, रितेश विकास माळी, धीरज निंबा महाजन, श्रीराम तुकाराम पाटील, योगेश योगराज माळी, निखिल कैलास सोनवणे, खुशांत राजगुरू पाटील, रोशन सुनील पाटील, तुषार अनिल पाटील, रवींद्र विजय म्हसके, खुशाल प्रकाश पाटील, प्रमोद अशोक पाटील, रोहित प्रमोद पाटील, संजय भगवान महाजन, समाधान भारत पाटील, हर्षल संतोष बोरसे, योगेश मधुकर चौधरी, अक्षय दीपक ब्राम्हणे, मयूर कैलास पाटील, तुकाराम विठ्ठल पाटील, भूषण तुकाराम पाटील, राजगुरू संजय पाटील, कमलेश दत्तू पाटील, राकेश विरभान पाटील, सौरभ शिवाजी पाटील, राज सुर्यभान पाटील, जयेश नंदलाल पाटील, मयूर गुलाबराव पाटील, मिलिंद राजकिशोर पाटील, विजय कैलास पाटील, निकेश नंदलाल पाटील, अनिल कुंभार, भूषण सुभाष पाटील.