Ncp Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २० उमेदवार ठरले; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ उमेदवाराचा समावेश…!

Ncp Ajit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. कोणाला किती जागा द्यायच्या, यावरून भाजपसह शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, अजित पवार गटाने २० संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील एका उमेदवाराचा सुद्धा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

Ncp Ajit Pawar: 20 candidates of NCP Ajit Pawar group; Including ‘this’ candidate from Jalgaon district…!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वत्र आतापासूनच राजकीय वातावरण तापलेले आहे. सत्ताधारी महायुतीने आपले जागावाटप अद्याप जाहीर केलेले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने त्यात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संभाव्य २० उमेदवारांची यादी समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ देखील उडाली आहे. अजित पवार गटाची नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाग घेतला आणि निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली. या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे आहेत. या यादीनुसार अजित पवार हे स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहेत, तर बीड परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निश्चित झाल्याचे कळते.

‘हे’ आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य २० उमेदवार

बारामती- अजित पवार, येवला- छगन भुजबळ, कागल- हसन मुश्रीफ, परळी- धनंजय मुंडे, दिंडोरी- नरहरी झिरवळ, आंबेगाव- दिलीप वळसे पाटील, अमळनेर- अनिल भाईदास पाटील, रायगड- अदिती तटकरे, अहमदनगर- संग्राम जगताप, खेड- दिलीप मोहिते पाटील, अहेरी- बाबा आत्राम, कळवण- नितीन पवार, इंदापूर- दत्ता भरणे, उदगीर- संजय बनसोडे, पुसद- इंद्रनिल नाईक, वाई- मकरंद आबा पाटील, पिंपरी- अण्णा बनसोडे, मावळ- सुनील शेळके, जुन्नर- अतूल बेनके, वडगाव शेरी- सुनील टिंगरे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button