अरे देवा…नवनीत राणा-रवी राणांच्या घरात घडले असे हे मोठे ‘अघटीत’ !

जळगाव टुडे । नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरात मोठे अघटीत घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याच घरातील नोकराने ते कृत्य केले असून, खार पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित नोकर फरार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. (Navneet Rana)

प्राप्त माहितीनुसार खार येथील घराच्या कपाटात आमदार रवी राणा यांनी ठेवलेली सुमारे 2 लाख रूपयांची रोकड रक्कम अचानक चोरीला गेल्याची घटना निदर्शनास आली आहे. त्यासंदर्भात पोलिसात फिर्याद देण्यात आली असून, आमदार राणा यांचा संशय त्यांचा नोकर अर्जून सुखिया याच्यावरच आहे. खार पोलिसांनी आमदार रवी राणा यांचे स्वीय सहायक संदीप ससे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयित नोकर अर्जूनच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात आमदार रवी राणा यांनी स्वीय सहायक संदीप ससे यांच्याकडे दोन लाख रुपये घर खर्चासाठी दिले होते. ससे यांनी सदरची रक्कम फ्लॅटच्या बेडरूममधील कपाटात सांभाळून ठेवली होती. कपाटाची चावी बाजुला असलेल्या हँगरलाच लटकवलेली होती. तीच संधी साधून आमदार राणा यांचा नोकर अर्जून सुखिया याने दोन लाख रूपयांवर हात मारला आहे. बिहारमधील दरभंगाचा रहिवासी असणारा अर्जुन याला राणा यांनी दहा महिन्यांपूर्वी घरकामासाठी ठेवून घेतले होते आणि तो नोकरांसाठी असलेल्या स्वतंत्र खोलीमध्ये राहायचा. कपाटातील दोन लाख रूपयांच्या रकमेवर नजर पडताच त्याची नियत फिरली. त्या रकमेवर हात साफ करून मार्चमधील दुसऱ्या आठवड्यात होळीच्या निमित्ताने कुटुंबीयांना भेटायला जातो, असे सांगून तो गावी गेला होता. तेव्हापासून तो परतलेला नाही तसेच त्याचा फोन सुद्धा लागत नाहीए.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button