Nationalist Congress Party : मोठी बातमी; राष्ट्रवादी अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश !
Nationalist Congress Party : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव तसेच घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आवाहन दिले आहे. त्या याचिकेवर झालेल्या सुनावनीत येत्या दोन आठवड्यांमध्ये काय ते उत्तर सादर करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अजित पवार गटाला दिल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Nationalist Congress Party : Big News; The Supreme Court gave this order to the NCP Ajit Pawar group!
निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी हे नाव तसेच घड्याळ चिन्ह बहाल करून मोठा दिलासा दिला होता. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाने आयोगाच्या त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासंदर्भातील सुनावणी मंगळवारी न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर झाली. सदर सुनावणीमध्ये अजित पवार गटाने दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर केल्यानंतर शरद पवार गटाला एक आठवड्यामध्ये त्याचे प्रत्युत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने काढले आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील अजित पवार गटाला उत्तर देण्याविषयीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, त्यांनी कोणतीच हालचाल आजतागायत केलेली नाही. याकडेही शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.
पिपाणीचाही वाद सर्वोच्च न्यायालयात
लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी वाजविणाऱ्या माणसाच्या चिन्हावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे १० उमेदवार उभे होते. पैकी ८ उमेदवार निवडून आलेले असले तरी पिपाणी चिन्हामुळे अनेक ठिकाणी शरद पवार गटाला मोठा फटका बसला. त्यामुळे तुतारीसाठी अडचणीची ठरलेले पिपाणी हे चिन्ह बाद ठरवावे, अशीही मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्याचीही दखल घेण्यात आली आहे.