शरद पवार गटाचे 10 आमदार अपात्र ठरणार ? मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

Nationalist Congress Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल याचिका विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी फेटाळल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने आता मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यानुसार आपापली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटातल्या 10 आमदारांना आज बुधवारी (ता. 21) दिले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आपोआपच अपात्र ठरतात, असा दावा करणारी याचिका अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिर्दोस पूनावाला यांच्या खंडपीठाने प्रतिपक्षाला म्हणजेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटाच्या आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी आपापली प्रतिज्ञापत्रे येत्या 11 मार्चपर्यंत सादर करावी, असे सांगून न्यायालयाने पुढील सुनावणी येत्या 14 मार्चला ठेवली आहे

WhatsApp Group

Related Articles

Back to top button