Narendra Modi : महिलांना आता घरात बसून एफआयआर दाखल करता येणार…!

जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याची ग्वाही देत आता महिलांना घरात बसून एफआयआर दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून, संबंधित कायदे अधिक कडक करण्याचा विचार केला जात आहे. “महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असेही मोदी यांनी येथे स्पष्ट केले.

Narendra Modi: Women can now file FIR sitting at home…!

जळगावमधील लखपती दीदी कार्यक्रमात केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेंतर्गत ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. याशिवाय बचत गटांसोबत काम करणाऱ्या महिलांना लाभ देण्यासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद सुद्धा साधला. याप्रसंगी पंतप्रधान मोंदी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देखील दिली. मला सर्व महिलांमध्ये राजमाता जिजाऊंची आणि सावित्रीबाई फुलेंची छाप दिसत आहे, असेही मोदींनी म्हटले.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावरील शिक्षेसाठी यापुढे कायदे कडक केली जातील. महिलांवर अत्याचार करणारा वाचणार नाही, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी महिलांसाठी सरकारच्या आगामी योजनांची माहिती देताना स्पष्ट केले की, “आता हा फक्त ट्रेलर आहे, यापुढे महिलांसाठीच्या योजना आणखी व्यापक करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना त्या दरडोई उत्पन्न वाढवून देशाच्या विकासात मोलाचा हातभार लावत असल्याचाही उल्लेख मोदींना केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक शेतीमध्ये नारीशक्तीला नेतृत्व देण्याची गरजही व्यक्त केली. त्यांच्या मते या नेतृत्वातून नवीन विचार आणि संकल्पना पुढे येतील, ज्यामुळे शेती अधिक प्रगत होईल. मोदी यांनी यावर भर दिला की, पूर्वी ज्यामध्ये मुलींसाठी अनेक मर्यादा होत्या, त्या क्षेत्रांमध्ये आता केंद्र सरकारने संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने बजेटमध्ये मोठी तरतूद केली असल्याचेही मोदींनी नमूद केले. यामुळे महिलांना विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणाचे नवीन मार्ग उघडणार आहेत. याशिवाय पंतप्रधानांनी महिला सशक्तीकरणाच्या दिशेने सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि महिलांसाठी आणखी प्रभावी योजना लवकरच आणण्याचे आश्वासन दिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button