Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांची खिल्ली उडवितात…!

Narendra Modi : महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना अंमलात आणल्याचा दावा महाराष्ट्रातील महायुती सरकार एकीकडे करत आहे, तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः अशा योजनांची खिल्ली उडविताना दिसून आले आहेत. अशा योजनांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्त्यांकडून गरिबांना प्रलोभन दाखविण्याचा प्रकार केला जात असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

Narendra Modi: When Narendra Modi, the country’s money maker, mocks women’s schemes…!

झारखंडमधील जमदेशपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा तसेच काँग्रेसच्या ध्येय आणि धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्त्यांकडून दाखविण्यात येणाऱ्या प्रलोभनांचाही समाचार घेतला. महिलांना पैसे देत असताना तुमच्या खिशातील पैशांवर हे लोक दरोडा टाकतील. प्रलोभनांचा वापर करून गरिबांना भूलवून सत्ता हासील करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, आवाहन देखील त्यांनी जाहीर सभेला उपस्थित जनसमुदायाला केले. भाजपसह मित्रपक्षांचे सरकार असलेल्या मध्यप्रदेशात त्यानंतर आता महाराष्ट्रात महिलांना दरमहा १५०० रूपये देण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना अंमलात आणली गेली आहे, याचे थोडेही भान पंतप्रधानांना काँग्रेसवर टीका करताना राहिले नाही. मात्र, त्यांच्या भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर विशेषकरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना महायुतीच्या सरकारवर ‘लाडकी बहीण’ योजनेवरून निशाणा साधण्याचे आयते कोलीत मिळाले आहे. समाज माध्यमांवर त्याविषयीचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेचे भवितव्य अधांतरी

लोकसभेच्या निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी पराभवाचे तोंड पाहावे लागल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही मोठा फटका आपल्याला बसू शकतो, याची जाणीव झाल्यानंतर महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. त्यामाध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रूपये देण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने इतर अनेक कल्याणकारी योजनांचा पैसा तिकडे मोठ्या प्रमाणात वळविल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला महिलांच्या मतांचे भरभरून दान मिळेल, अशी आशा महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाला वाटत आहे. प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या असंख्य महिलांना अद्याप कोणतीच रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे सर्वत्र नाराजी देखील व्यक्त होत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button