पंतप्रधानांच्या हस्ते अमृत भारत योजनेंतर्गत 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ

जळगाव जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचाही समावेश

Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे 41 हजार कोटी रूपयांच्या रेल्वे प्रकल्पांची देश वासीयांना सोमवारी अनोखी भेट दिली. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ तसेच 1585 ओव्हर ब्रीज/ अंडरपासचे भूमिपूजन/ उद्घाटन/राष्ट्राला समर्पण नरेंद्र मोदी यांनी केले. त्यात जळगाव जिल्ह्यातील शिरसोली, तरसोद, पाचोरा आदी काही स्थानकांचा समावेश होता.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम पार पडला. शिरसोली स्थानकावरील कोनशिला अनावरणाच्या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाचोरा रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमावेळी खासदार उन्मेश पाटील उपस्थित होते. अशाच प्रकारे मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव प्रामुख्याने उपस्थित होते. देशात 1585 ओव्हर ब्रिज आणि अंडर पासेस निर्माण केल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर होणारे अपघात तसेच वेळेचा व इंधनाचा अपव्यय कमी होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button