प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून आज देश वासियांशी साधणार संवाद
Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देश वासियांशी रविवारी (ता. 25) सकाळी 11.00 वाजता संवाद साधतील. आकाशवाणी, दूरदर्शन आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपच्या सर्व वाहिन्यांवर तसेच डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यू ट्युब वाहिन्यांवरही या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा हा 110 वा भाग प्रसारीत होत आहे. हिंदी भाषेतल्या सदरच्या कार्यक्रमानंतर आकाशवाणीकडून लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषेतून प्रसारण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम करतात. आज ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 110 वा भाग आहे. त्यामाध्यमातून नरेंद्र मोदी देशातील जनतेशी कोणत्या विषयावर संवाद साधतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला यावेळी विशेष महत्व प्राप्त झाले आहे.