जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिले स्थान
Narendra Modi : मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सर्व्हेने जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले स्थान पटकावले आहे. पंतप्रधान मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले असून, त्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगातील सर्व आघाडीच्या नेत्यांना मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे.
सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सर्वेक्षणात 77 टक्के लोकप्रियतेसह अव्वल दाखवण्यात आले आहे. तसेच मेक्सिकन पंतप्रधान आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांची लोकप्रियता 64 टक्के आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल होम अफेयर्स विभागाचे प्रमुख अलेन बर्सेट यांना 57 टक्के, तर पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांना 50 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. तर ब्राझीलचे पंतप्रधान लुईझ इंसिओ लुला दा सिल्वा यांना 47 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 45 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जागतिक स्तरावर 44 टक्के लोकप्रियता मिळवली आहे. यानंतर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना या यादीत 38 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना 37 टक्के लोकप्रियता मिळाली आहे. या यादीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लोकप्रियतेचा आकडा 35 टक्के आहे. तर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन हे 33 टक्के, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 27 टक्के, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना 24 टक्के आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-येओल यांना 20 टक्के लोकप्रिय मानले जाते.