मोदींच्या डोक्यावर शिवरायांसारखा जिरेटोप घातला, शरद पवार राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेलांची लाज काढली

जळगाव टुडे । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केली. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या डोक्यावर थेट शिवरायांसारखा जिरेटोप अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी घातला. त्यांचे ते कृत्य वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने पटेलांना त्याबद्दल खडे बोल सुनावले देखील आहेत. प्रसंगी प्रफुल्ल पटेल यांना लाज बाळगण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी मोदींना शिवरायांसारखा जिरेटोप प्रफुल्ल पटेल यांनी घातला आणि वादाची ठिणगी पडली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पटेल यांच्यावर निशाणा साधताना संताप व्यक्त केला आहे. ‘प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, “जिरेटोप” आहे तो तुमच्या हातात अन् त्या माणसाच्या डोक्यावर शोभत नाही ! रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना व ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारी ही बुध्दी कुठे,’ अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करताना आपल्या पोस्टमध्ये प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button