ब्रेकींग न्यूज….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना दिली ‘ही’ मोठी ऑफर !

जळगाव टुडे । “बारामतीमध्ये झालेल्या मतदानानंतर शरद पवार खूपच चिंतेत असून, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची मानसिकता देखील बनवली आहे. तसेच चार जूनच्या निकालानंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यापेक्षा त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहून आपले स्वप्न पूर्ण करावे,” अशी मोठी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नंदुरबारमध्ये बोलताना शरद पवारांना दिली आहे.

महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना थेट अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे संकेत नुकतेच दिले. त्याबद्दल जास्तच चर्चा रंगल्यानंतर त्यांनी आपला तसा कोणताच विचार नसल्याचे लगेचच स्पष्टही केले. त्यापार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा त्यांचे पुतणे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्यासोबत आम्ही कधीच जाणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आतापर्यंतच्या तीन टप्प्यातील मतदानाची परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत आणि त्याच अस्वस्थेतून नरेंद्र मोदी अशी वक्तव्ये करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button