अब की बार 370 पार…दिल्लीत भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Narendra Modi : अब की बार 370 पारचा नारा देत दिल्लीतील दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनात भाजपने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. 370 पेक्षा जास्त जिंकण्यासाठी उमेदवार नव्हे तर कमळ हे निवडणूक चिन्ह मनात ठेवा. 25 फेब्रुवारीपासून कार्यकर्त्यांनी 100 दिवस अथक परिश्रम घ्यावे आणि प्रत्येक बूथवर गेल्या वेळेपेक्षा 370 मते जास्त मिळवावी, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केले.

नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे सुरू असलेल्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाचा ध्वज फडकावून केले. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री, पक्ष शासित राज्याचे मुख्यमंत्री, राज्यमंत्री, राष्ट्रीय आणि प्रदेश पदाधिकारी, खासदार आणि आमदारांसह सुमारे 11,500 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत 370 पेक्षा जास्त जागांवर कमळ चिन्ह निवडून ज्यांनी कलम 370 हटवण्यासाठी बलिदान दिले, त्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केले. नरेंद्र मोदी म्हणाले, की जो कोणी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतो त्याला जिंकावेच लागते, मग तो प्रसिद्ध असो किंवा नवीन. दरम्यान, गरीब कल्याणशी संबंधित विकास कामे आणि उपक्रमांच्या आधारावर भाजप लोकसभा निवडणुकीत उतरेल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button