नंदुरबार जिल्ह्यात पाण्यात पाय घसरून पडल्याने दोन जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू !

जळगाव टुडे । जवळच्या दोन मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar News) नवापूर तालुक्यात घडली आहे. बेडकी येथील दोन 16 वर्षीय मुली बोरपाडा धरणात आंघोळीसाठी गेल्या असताना ही दुर्घटना घडली. मदतीसाठी आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नवापूर तालुक्यातील बेडकी येथील उज्वला गावित आणि मिखा सानू गावित या दोन्ही मैत्रिणी धरणाच्या काठावर आंघोळीसाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना त्या काठावरील दगडावरून घसरल्या आणि पाण्यात पडल्या. त्यावेळी मदतीसाठी आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांना वेळेत मदत मिळाली नाही. त्यामुळे दोघींचा पाण्यातच मृत्यू झाला.

दोन्ही मुली पाण्यात बुडून मरून पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच बेडकी येथील ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत सर्वकाही संपले होते. दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळले. विसरवाडी पोलिस ठाण्याचे दाखल झाल्यानंतर पंचनामा आटोपून दोन्ही मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button