Muktainagar News : मुक्ताईनगर तालुक्यात जातीय तेढ निर्माण करून अराजकता निर्माण करण्याचा काही जणांकडून प्रयत्न…!

रोहिणी खडसे यांनी केला आरोप

Muktainagar News : ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातील गावागावात सभागृह, अंतर्गत रस्ते, शिक्षण,आरोग्य, पाणी पुरवठा अशा मुलभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. एकनाथराव खडसे यांनी गेल्या ३० वर्षात जातीपाती विरहित सर्वसमावेशक राजकारण करत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. परंतु गेल्या पाच वर्षात मतदारसंघ विकासात मागे पडला असून, जातीय तेढ निर्माण करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

Muktainagar News : Some people are trying to create chaos in Muktainagar taluka by creating communal rift…!

मुक्ताईनगर विधानसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांचा लुमखेडा, भिलवस्ती, उदळी खु, उदळी बु, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, रायपुर, सुदगाव,मांगी चूनवाडे थोरगव्हाण या गावात मतदार संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. याप्रसंगी ग्रामस्थांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या, की मुक्ताईनगर मतदारसंघांत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून विकास कामे करण्याच्या तीन महिने आधीच सदर कामावरील शासकीय निधी काढून, ती कामे स्वखर्चातून केल्याचे दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. काही ठिकाणी कामे न करता शासकीय निधी लाटला जात आहे. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी आणि मतदासंघांचा कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, मुलभूत सुविधा असा सर्वांगीण विकास करण्यासाठी आ एकनाथराव खडसे, ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुण पाटील, राजाराम महाजन, उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढत असलेल्या निवडणुकीत आपल्या “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावा.

अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार

प्रचारादरम्यान गावोगावी महिला माझ्याजवळ येऊन गेल्या पाच वर्षात गावात अवैध नकली दारू विक्री वाढली असल्याची त्यातून अनेकांचे संसार उध्वस्त होत असून दारू विक्री बंद करण्याची मागणी करत आहेत. अवैध दारू विक्रीतून जीवितहानी घडल्याच्या मतदासंघांत घटना घडल्या असून अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. यावेळी माजी पं स सदस्य दिपक पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्ष किशोर पाटिल,शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अविनाश पाटील, सौ.शारदाताई खडसे चौधरी, मनोज खैरनार, मधुकर पाटील, नितीन पाटील, श्रीकांत चौधरी,शशांक पाटील, रविंद्र महाजन,सचिन महाले, राहुल फेगडे, शांताराम पाटील, दुष्यांत पाटील, ललित पाटिल, बंटी चौधरी, पांडुरंग झांबरे, भागवत कोळी,गजानन कांडेले, जयवंत राजपूत, रविंद्र पाटील,गणेश देवगिरीकर,गफ्फुर कोळी,कमलेश भारंबे,संतोष वाघ,चेतन पाटील,आकाश पाटील,रोहन चऱ्हाटे , चेतन पाटील, संजय पाटील, केतन पाटील, भागवत कोळी, अश्विन तायडे, सिद्धार्थ तायडे, संजय पाटील, गुणवंत पाटील, प्रकाश पाटील, भूषण कोळी, नितीन पाटील, आकाश पाटील, राजू कोळी, ब्रिजलाल कोळी, राहुल चौधरी, समाधान कोळी, विजय पाटील, ईश्वर चौधरी, हर्षल पाटील,भगवान सावळे, गोकुळ कोळी आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button