Muktainagar News : मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांना ज्येष्ठांकडून विजयी भव: आशिर्वाद…!

Muktainagar News : मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरिल बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. रोहिणी खडसे यांना प्रचार रॅलीच्या वेळी मतदारसंघातील सर्वच ज्येष्ठांकडून विजयी भव: आशिर्वाद मिळताना दिसत आहे.

Muktainagar News : In Muktainagar Constituency, Rohini Khadse gets victory from seniors: Blessings…!

मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या, की गेली ३० वर्षे तुम्ही सर्वांनी आमदार एकनाथराव खडसे यांना खंबीर साथ दिली. त्या पाठबळावर आ.खडसे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली. गोरगरीब जनतेची सेवा करणे हे कर्तव्य मानून विरोधकांनी टीका केली तरी तिकडे दुर्लक्ष करून सतत जनतेच्या सेवेत राहिले. त्यामुळे जनतेने सतत सहा पंचवार्षिक त्यांच्यावर विश्र्वास टाकला. त्यांच्याकडून जनसेवेचा वसा वारसा घेऊन आणि रवींद्र भैय्या पाटील, अरुण पाटील, राजाराम महाजन, उदयसिंह पाटील आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची निवडणूक मी लढवत आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी यांनी मतदारांशी संवाद साधताना म्हणाले, की आ.एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना मतदारसंघाला एक नवीन ओळख मिळवुन दिली. आदिशक्ती मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन या नगरीचे नामकरण मुक्ताईनगर केले. मतदारसंघात व शहरात मुलभूत सुविधांचे निर्माण केले. मुक्ताईनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालय आणले. भविष्यात या महाविद्यालयामार्फत परिसरातील शेतकरी बांधवांना शेतीतील नविन तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढीविषयी मार्गदर्शन लाभेल. जुन्या गावातील अनेक घरे पूर्णा नदीच्या पुरात बाधित होत होते. आ.एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून पुर बाधित घरांचे पुनर्वसन केले गेले. काही घरांचे पुनर्वसन अद्याप बाकी राहिले आहे. शहराचे काही प्रश्न बाकी आहेत. रोहिणी खडसे भविष्यात नक्कीच सर्व समस्या मार्गी लावतील.

यावेळी रऊफ खान यांनी मतदारांशी संवाद साधताना म्हणाले, की अल्पसंख्यांक समुदायातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यामधील कौशल्य विकसित होऊन तांत्रिक शिक्षण मिळावे, यासाठी शासकिय पॉलिटेक्निक कॉलेज आणले. कॉलेजच्या इमारतीचे बहुतांशी काम पुर्ण झाले आहे. परंतु शिक्षणाचे महत्व नसल्याने गेल्या पाच वर्षात हे कॉलेज सुरू होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. रोहिणी खडसे या पाठपुरावा करून येत्या शैक्षणिक वर्षा पासुन कॉलेज सुरू करतील, असा विश्र्वास आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांपूर्वी विविध आश्वासने देऊन निवडून आल्यावर सतत सत्तेत राहुन सुद्धा दिलेले आश्वासने बैठका आणि कागदपत्रांपुरते मर्यादित राहिले. म्हणुन आता मतदरसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मतदानरूपी आशिर्वाद देउन बहुमताने विजयी करावे, प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button