जळगावमध्ये दूध, केळी, कापूस, ज्वारीच्या प्रश्नावर आज महाविकास आघाडीचे आंदोलन !

जळगाव टुडे । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दूध, केळी, कापूस, ज्वारी खरेदीच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवारी (ता.१०) सकाळी दहा वाजेपासून महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी संघटना व समविचारी पक्ष सहभागी होतील. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे. ( Jalgaon News )

Jalgaon News
गायीच्या दुधाला मंजूर केलेला ३० रूपये प्रति लिटरचा भाव आणि ५ रूपये प्रति लिटरचा भाव फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेल्या प्रस्तावांना देखील ५ रूपये प्रति लिटरचे अनुदान तात्काळ मंजूर करावे, ही पहिली मागणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील ६,६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई शासनाने नामंजूर केली असून, याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पीकविमा तक्रार निवारण समितीने मंजुरी देऊन देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केला आहे. सदरची नुकसान भरपाई तातडीने मंजूर करावी, ही दुसरी मागणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

कापसाचे भाव पडल्यानंतर शासनाने भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. सदरचे अनुदान कोणत्याही अटी व शर्ती न लावता सरसकट सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे. तसेच शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलेले असली तरी त्याठिकाणी शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीच होत नसल्याचे दिसून आले आहे. ज्वारी साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही, असे उत्तर मिळत असल्याने तात्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी, या मागण्या देखील धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button