राज्यात सर्वत्र आज वादळी पावसाचा इशारा; जळगावमध्ये कशी राहील स्थिती ?

जळगाव टुडे । राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यभरात साधारण 20 जूननंतर मान्सून सक्रीय होईल आणि सर्वदूर समाधानकारक पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आज रविवारी छत्रपती संभाजीनगर तसेच जळगाव, जालना, सांगली, कोल्हापूर जिल्हे वगळता सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ( Monsoon Update )

अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग मंदावल्यानंतर त्याचा मोठा परिणाम मान्सुनच्या वाटचालीवर देखील झाला आहे. राज्याच्या सीमेपर्यंत येऊन ठेपलेला मान्सून मध्येच अडखळल्याने बऱ्याच भागात अजुनही पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. पेरणीपूर्व मशागत आटोपून पावसाची प्रतिक्षा करणारे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. तुरळक पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्यावर काही भागातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची जोखीम पत्करली होती. मात्र, नंतरच्या काळात पुरेसा पाऊस पडलेला नसल्याने संबंधित शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही अद्याप लक्षणीय अशी घट झालेली नाही. त्यामुळे पेरणीनंतर नुकतीच उगवलेली कोवळी पिके माना टाकू लागली आहेत.

रविवारी (ता.16 जून) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासात पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
रत्नागिरी- 23.1, मुंबई- 4.1, हरने- 30.0, छत्रपती संभाजी नगर- 1.2, धाराशीव- 3.6, परभणी- 7.4, अकोला- 2.1, अमरावती- 4.6, बुलडाणा- 14.0, नागपूर- 1.4, वर्धा- 3.6, वाशीम- 4.0, यवतमाळ- 24.0, महाबळेश्वर- 19.2, नाशिक- 23.8, जळगाव- 30.0

WhatsApp Group

Related Articles

Back to top button