मॉन्सूनची जळगावपर्यंत मजल; आज बुधवारी देखील जोरदार पावसाचा इशारा !
जळगाव टुडे | सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस आधीच दाखल झालेल्या मॉन्सूनची आगेकूच सुरूच असून, त्याने खान्देशातील जळगावपर्यंत मजल देखील मारली आहे. जळगावमध्ये मंगळवारी सकाळी सुमारे 93.0 मिलीमीटर पावसाची नोंद सुद्धा घेण्यात आली. दरम्यान आज बुधवारी (ता.12) मॉन्सूनच्या वाटचालीत आणखी प्रगती होण्याची चिन्हे असून, बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस पडला आहे तिथे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातील पेरणीची संधी साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. (Monsoon Update)
बुधवारी (ता.12) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील पाऊस (मिलीमीटरमध्ये)
अहमदनगर- 8.2, जेऊर- 42.6, महाबळेश्वर- 73.3, सांगली- 13.4, सातारा- 1.8, सोलापूर- 56.6, अकोला- 46.3, अमरावती- 5.0, बुलडाणा- 7.0, ब्रम्हपुरी- 12.0, चंद्रपूर- 3.0, गडचिरोली- 7.2, यवतमाळ- 11.0, धाराशिव- 49.4, डहाणू- 126.4, मुंबई- 20.0, रत्नागिरी- 6.4