राज्यात ठिकठिकाणी मॉन्सूनची हजेरी; आज देखील पावसाचा अंदाज !
जळगाव टुडे | केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून हळूहळू महाराष्ट्र राज्य व्यापताना दिसत असून, ठिकठिकाणी पावसाची हजेरी देखील लागली आहे. जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, महाबळेश्वर, बीड, नांदेड, धाराशिव, उदगीरचा त्यात समावेश आहे. कोकण किनारपट्टीच्या भागातील रत्नागिरी व मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज देखील राज्याच्या बऱ्याच भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Monsoon Update)
दरम्यान, पावसाळी वातावरणाची निर्मिती झाल्यानंतर आर्द्रतेच्या प्रमाणातही मोठी झाली आहे. त्यामुळे उकाडा वाढल्याने अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या आहेत. तापमानातही चार ते पाच अंश सेल्सिअसने घट झाली असून, उन्हामुळे होणारी काहिली परिणामी बऱ्याचअंशी कमी झाली आहे.
सोमवारी (ता.10) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील पाऊस (मिलीमीटरमध्ये)
रत्नागिरी- 107.4, मुंबई- 19.8, अहमदनगर- 19.8, कोल्हापूर- 16.9, महाबळेश्वर- 41.4, सांगली- 19.3, सातारा- 61.0, सोलापूर- 11.6, बीड- 18.2, नांदेड- 20.8, धाराशिव- 57.4, परभणी- 0.8, उदगीर- 47.0, नागपूर- 4.0, वर्धा- 3.6, यवतमाळ- 10.0