‘आयएमडी’चा नवा अंदाज…महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत मॉन्सून होणार दाखल !

जळगाव टुडे । भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार मॉन्सून अंदमान-निकोबारमध्ये पोहोचला असून, तो साधारणपणे 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल. यंदा मॉन्सून सामान्य तारखेपूर्वीच केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र, केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख ही एक जून आहे. जाहीर केलेल्या तारखेत चार दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता देखील आहे. तरीही 28 मे पासून तीन जून दरम्यानच्या कालावधीत कधीही मॉन्सून पदार्पण करू शकतो. (Monsoon Update)

आयएमडीच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखा गेल्या 150 वर्षांमध्ये खूप वेगळ्या असल्याचे दिसून आले आहे. सन 1918 मध्ये मॉन्सून 11 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता, तर 1972 मध्ये तो 18 जून रोजी सर्वात उशिरा केरळमध्ये पोहोचला होता. गेल्या चार वर्षांचे बोलायचे झाले तर 2020 मध्ये मॉन्सून 1 जून रोजी, 2021 मध्ये 3 जून रोजी, 2022 मध्ये 29 मे रोजी आणि 2023 मध्ये 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता.

यंदा ‘ला निनो’मुळे चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मॉन्सून 9 ते 16 जून दरम्यान महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय राजस्थानमध्ये 25 जून आणि 6 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. तर उत्तरप्रदेशात 18 ते 25 जूनपर्यंत आणि बिहार-झारखंडमध्ये 18 जूनपर्यंत पोहोचेल. दरम्यान, यंदा ‘ला निनो’मुळे चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button