बारामतीच्या करामती…मतदानाच्या आदल्या दिवशी पडला पैशांचा पाऊस !

Jalgaon Today : लोकसभेच्या बारामती मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्याच्या जोडीची प्रतिष्ठा पणाला लागली असून, आज मंगळवारी (ता.07) तिथे चुरशीच्या वातावरणात मतदान होत आहे. दरम्यान, मतदानाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री बारामतीमध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याची चर्चा आहे. खुद्द रोहित पवार यांनी बारामतीमध्ये पोलिस बंदोबस्तात पैशांचा पाऊस पडल्याचे पुराव्यासह ट्वीट करून खळबळ उडवून दिली आहे.

आज मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी मध्यरात्री विरोधकांकडून पैसे वाटले गेल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या त्यासंदर्भातील ट्विटने उलटसुलट चर्चांना चांगलेत उधाण देखील आले आहे. ”बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही त्यात दिसतायेत…यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा?”, अशा आशयाचे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. त्यांनी या ट्विटसह अनेक व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. त्याद्वारे पोलिसांमोरच मतदानासाठी पैसे दिले जात असल्याचे दिसून येत आहे. एकूण प्रकार लक्षात घेता बारामतीची निवडणूक कोणत्या थराला गेली आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो.

रोहित पवार यांनी केलेले हेच ते धक्कादायक ट्वीट.

Money rained in Baramati on the eve of polling

WhatsApp Group

Related Articles

Back to top button