म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाच्या पाण्यामुळे लागली गळती !

जळगाव । तालुक्यातील म्हसावद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी, रूग्णांना तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. आधीच आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. त्यामुळे गळतीपासून बचाव करण्यासाठी केंद्राच्या छतावर ताडपत्री देखील टाकण्यात आली आहे. ( Mhasawad PHC )

म्हसावदच्या आरोग्य केंद्रात औषधी ठेवण्यासाठी मेडिकल स्टॉक रूमची व्यवस्था आहे. याशिवाय कागदपत्रांसह महत्वाचे साहित्याची रूम देखील आहे. मात्र, पावसामुळे छताला गळती लागल्याने औषधांसह अनेक वस्तू बॅनरने तसेच कापडाने झाकण्यात आलेले आहेत. अनेक वेळा तक्रारी करुन सुद्धा छताच्या गळतीची समस्या अद्याप सुटलेली नाही. म्हसावद आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास 26 गावे येतात. परिसरातील हे एकमेव आरोग्य केंद्र असल्यामुळे सर्व रुग्ण हे म्हसावद येथे उपचारासाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी गर्दी होत असताना रुग्णांना बसण्याची किंवा ॲडमिट करण्याची कोणत्याही प्रकारची सोय नाही. आरोग्य केंद्राच्या आवारातही मोठे गवत वाढलेले आहे तसेच अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रूग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीचे काम करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे

WhatsApp Group

Related Articles

Back to top button