कन्नड घाट बस अपघातातील प्रवाशांच्या जेवणाची आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाकडून व्यवस्था

चाळीसगावकरांच्या माणुसकीचे अनोखे दर्शन

Mangesh Chavan : संभाजीनगर येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या बसला कन्नड घाटाच्या पायथ्याशी सोमवारी (ता.11) दुपारी अपघात झाला होता. सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. सदर बसमध्ये बहुतांश मध्यप्रदेश येथील कष्टकरी मजूर वर्ग व त्यांची लहान मुले होती. अपघाताच्या ठिकाणाहुन त्यांना पोलीस दल व राज्य परिवहन महामंडळाच्या मदतीने चाळीसगाव येथे आणण्यात आले. मात्र, बराच उशीर झाल्याने बसमधील प्रवाशांचे विशेषतः लहान बाळांच्या खाण्यापिण्याचे हाल झाले होते. ही बाब पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कळवली, तेव्हा तुम्ही त्यांना चाळीसगावात आणा आम्ही तोपर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो, असे आश्वस्त करण्यात आले.

सोमवारी साधारण 11.45 वाजता मध्यप्रदेश परिवहनची साधारण 50 प्रवासी असलेली बस कन्नड घाट उतरताना अपघातग्रस्त झाली होती. घटनास्थळी चाळीसगावचे तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक पोहोचल्यावर मदत कार्याला वेग आला. वैद्यकीय उपचारासाठी 05 रुग्णवाहिका देखील पोहोचल्या आहेत. दरम्यान, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयाकडून तातडीने सूत्रे हलविण्यात आल्याने लांबच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांची उपसमार टळली.

अपघातग्रस्त प्रवाशांनी भरलेली बस चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व आमदार कार्यालयातील कर्मचारी हे त्यांच्यासाठी जेवण घेऊन तयार होते. सर्व प्रवाशांना त्यांनी जेवण देऊन त्याठिकाणी थोडा वेळ राम करू दिला. त्यानंतर त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी एस.टी. बसने धुळे रवाना केले. परराज्यातील अनोळखी अपघातग्रस्तांना तातडीने अपघातस्थळी मदत तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिल्याने खऱ्या अर्थाने चाळीसगावकरांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button