आमदार मंगेश चव्हाण 100 दिवसातच पूर्ण करणार चाळीसगावच्या तितुर नदीवरील पुलाचे काम…!
चाळीसगावच्या इतिहासात प्रथमच विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पणाची तारीख जाहीर करणारे आमदार
Mangesh Chavan : चाळीसगाव शहरात दरवर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या महापुराच्या समस्येला कारणीभूत ठरणारा हॉटेल दयानंदजवळील धोकादायक पूल पाडून त्याजागी नवीन उंच पूल आता उभारला जाणार आहे. सदरचे काम पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असताना, चाळीसगावचे कार्यतत्पर आमदार मंगेश चव्हाण यांनी अवघ्या 100 दिवसातच सदर पुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी पुलाच्या भूमिपूजनासोबत लोकार्पणाची तारीख त्यांनी काम सुरू होण्यापूर्वीच जाहीर केली आहे.
चाळीसगाव तालुक्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विकासकामांचा नुसता झंझावात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव शहरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा बनलेला हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील धोकादायक पूल पाडून त्याजागी नवीन पूल उभारण्याचे नियोजन सुरू झाले आहे. तितुर नदीवरील पूल तयार झाल्यानंतर चाळीसगाव शहरातील महापुराची समस्या कायमची निकाली निघू शकणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या महापुराच्या समस्येमुळे चाळीसगावकरांना खूप मोठे नुकसान दरवर्षी सोसावे लागायचे. प्रसंगी जीवित व वित्त हानी सुद्धा होत असे. तितुर नदीवरील धोकादायक पुलाच्या जागी नवीन पूल उभारल्यानंतर महापुराच्या समस्येवर कायमचा तोडगा निघणार आहे. हे लक्षात घेऊनच आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तितुर नदीवरील पुलाचे काम हाती घेण्यात येत आहे.
विक्रमी वेळेत पूर्ण करणार पुलाचे काम
चाळीसगाव शहरात महापुराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील धोकादायक पुलाचे
भूमीपूजन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते गुरुवारी (ता.07 मार्च) दुपारी एकला होणार आहे. विशेष म्हणजे भूमिपूजन होताच बरोबर 100 दिवसानंतर 14 जून 2024 रोजी प्रस्तावित पुलाचे लोकार्पण देखील केले जाणार आहे. चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पणाची तारीख जाहीर करणारे आमदार मंगेश चव्हाण हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत.
नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत रहदारीच्या मार्गात असा राहील बदल
अवजड वाहने :
1) भडगाव-हिरापूर रोड-पाटखडकी-कन्नड
2) नागद-कृषी उत्पन्न बाजार समिती-कन्नड बायपास- चाळीसगाव शहर
छोटी वाहने :
1) कन्नड – नागद चौक- तिरंगा पूल मार्गे – चाळीसगाव शहर
2) हॉटेल सदानंद-रिंगरोड-गुजरी व दत्तवाडी पूल मार्गे-चाळीगाव शहर