बहिणीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा लहान भाऊ जेव्हा घेतो खांद्यावर….

Mangesh Chavan : भाजपकडून जळगावमधून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिताताई वाघ यांनी मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते तसेच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. दरम्यान, निवडणुकीचे धनुष्य पेलताना जीवाचे रान करण्याची वेळ आली असताना, बहिणीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा खांद्यावर घेणारा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासारखा लहान भाऊ स्मिताताईंसाठी मोठी ताकद बनला आहे.

जळगावच्या लोकसभा निवडणुकीसाठी सन 2019 मध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिताताई वाघ यांनी निवडणूक प्रचाराला जोमाने सुरूवात देखील केली होती. दुर्दैवाने नंतर त्यांचे तिकीट कापले जाऊन लोकसभेत जाण्याची संधी हुकली होती. अशा या विपरित परिस्थितीतही संयम ढळू न देता भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार त्यांनी केल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळेच भाजपाने यावेळी जळगावच्या जागेसाठी त्यांच्या नावाचा पुनर्विचार केला आहे. विद्यार्थी परिषदेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर्यायाने भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी जुळलेल्या स्मिताताई वाघ यांच्यासाठी निवडणूक आणि प्रचार मोहिमा तशा नवीन नाहीत. जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि विधान परिषदेचे आमदारपद तसेच इतर बरीचे महत्वाची राजकीय पदे त्यांनी यापूर्वी भूषविली आहेत. हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलण्याचे कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे.

दरम्यान, स्मिताताई वाघ यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या विजयासाठी सर्वात जास्त कोणी प्रयत्नांची पराकाष्टा केली असेल, तर ते चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आहेत. स्मिताताईंना उमेदवारी मिळताच आमदार चव्हाण यांनी सर्वात आधी आपल्या चाळीसगाव तालुक्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्याद्वारे स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव तालुक्यातून सुमारे एक लाखांचे मताधिक्य देण्याचा निर्धार देखील केला. तेवढ्यावरच न थांबता आमदार मंगेश चव्हाण यांनी आता बहिणीच्या प्रचारासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघातील एक एक तालुका पिंजण्यास सुरूवात केली आहे. भाजपासह मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. याशिवाय भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणी मेळावे घेऊन नियोजनबद्ध कामाची चुणूक सुद्धा दाखवून दिली आहे. परवा अमळनेर तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्याची प्रचिती आल्याशिवाय राहिली नाही.

स्मिताताईंना मिळाले दहा हत्तींचे बळ
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कमी दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे नसल्याचे लक्षात घेऊन स्मिताताईंनी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तुम्हीच स्मिता वाघ आहात, असे समजून मतदारसंघ सांभाळून घेण्याचे भावनिक आवाहन केले आहे. तर दुसरीकडे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट निवडणुकीची धुरा खांद्यावर घेऊन स्मिताताईंना अक्षरशः दहा हत्तींचे बळ दिले आहे. त्यामुळे स्मिताताई वाघ यांच्या विजयाची वाट आणखी सुकर झाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button