लाभार्थ्याच्या घरी जेवण, शेकोटी पेटवून ग्रामस्थांशी संवाद…गाव चलो अभियानात आमदार मंगेश चव्हाण लोंजे गावात मुक्कामी…

Mangesh Chavan : सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी चक्क आमदार गावाला भेट देतात व रात्रभर मुक्कामी थांबून त्यांच्याशी संवाद साधतात, असे आजवर कधी घडले नव्हते. मात्र असे घडलेय भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून आणि त्यात सहभागी होणारे आमदार आहेत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत मांडण्यासाठी तसेच केलेली विकास कामे यांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे “गाव चलो अभियान” राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ग्रामविकास मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख पासून ते थेट आमदार, खासदार, मंत्री आदी लोकप्रतिनिधी यांनी देखील सहभागी होण्याचे व एक दिवस ग्रामीण भागात मुक्कामी राहण्याचे निर्देश पक्ष संघटनेकडून देण्यात आले होते. त्याअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील बुथ क्रमांक ३३८ वर स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देण्याचे निश्चित केले त्यानुसार व दि.१० फेब्रुवारी रोजी लोंजे साईनगर या गावाला त्यांनी मुक्काम केला. एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी असणाऱ्या कुटुंबाच्या घरी त्यांनी जेवण केले, गावात घरोघरी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे पत्रक वाटप केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले कमळाचे व “फिर एक बार मोदी सरकार” असे भित्तिचित्रे असलेले दिवार लेखन देखील त्यांनी केले. थंडीचे दिवस असल्याने गावात बऱ्याच ठिकाणी शेकोटी देखील पेटविण्यात आली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी शेकोटीची ऊब घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व आपल्या पक्षाचे बूथ प्रमुख व लोंजे साईनगर गावाचे सरपंच बळीराम चव्हाण यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला.

विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व सेवालाल भवन उभारण्याचे आश्वासन
चाळीसगाव तालुक्यातील लोंजे गावातून आंबेहोळ व साईनगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विभक्त करण्यात आल्या होत्या. नवीन ग्रामपंचायतींचे हे पहिलेच वर्ष असल्याने त्यांना विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले होते. गेल्या ४ वर्षात आपल्या आमदारकीच्या माध्यमातून लोंजे आंबेहोळ व लोंजे साईनगर या दोन्ही गावात मंजूर असलेल्या कोट्यवधींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण देखील त्यांनी केले.

आमदारांसोबत यांची होती उपस्थिती
भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, माजी जि. प.सभापती राजुभाऊ राठोड, कृउबा सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, माजी पं. स.उपसभापती सतिश पाटे, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, नमोताई राठोड, सुनील पवार, धनराज तात्या पाटील, विवेक चौधरी, कैलास पाटील, राम पाटील, राजू पगार, संजय कुमावत, लोंजे सरपंच बळीराम चव्हाण, आंबेहोळ सरपंच भरत शेट चव्हाण, जुनोने सरपंच गोरख राठोड, वागले सरपंच रामदास पवार, वलठाण सरपंच सीताराम राठोड, गोरखपुर् उपसरपंच योगेश जाधव, चैतन्य तांडा सरपंच व चेअरमन दिनकर राठोड, शिंदी उपसरपंच व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, बोढरे सरपंच गुलाब राठोड, खेर्डे उपसरपंच ममराज जाधव, सायगव्हाण माजी सरपंच बाबू राठोड, कृष्णनगर उपसरपंच मनोज चव्हाण, वाकडी सरपंच. प्रकाश पाटील, राजणगाव सरपंच प्रमोद चव्हाण सर, विनीत राठोड, बबलू चव्हाण, अविनाश राठोड, वाडिलाल राठोड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button