Maktainagar News : कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्याची धमक रोहिणी खडसे यांच्यामध्येच…!

-कुऱ्हा येथील सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांना विश्वास

Maktainagar News : कुऱ्हा परिसराने कायम आ.एकनाथराव खडसे यांना साथ दिली आहे. आताही मतदारांनी रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बहुमताने विजयी करावे. कुऱ्हा-कुंड धारणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनीच मार्गी लावला होता. त्यांच्यामध्ये पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याची धमक आहे. कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठीही त्याच पाठपुरावा करतील, असा विश्वास कुऱ्हा येथील सरपंच डॉ.बी.सी.महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Maktainagar News : Threat between Rohini Khadse to follow up to complete Kurha Wadhoda scheme…!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा, थेरोळा, तालखेडा, उमरे, जोंधनखेडा, हिवरा, राजुरा, बोरखेडा, काकोडा पारंबी येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संवाद दौरा काढून मतदारांशी संवाद साधून मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोलतांना डॉ.बी.सी. महाजन म्हणाले, की कुऱ्हा वढोदा परिसरातील शेती सिंचित होऊन कोरडवाहू परिसर हिरवागार होऊन शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आ.एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा वढोदा परिसर उपसा सिंचन योजना आणली. ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला परंतु द्वेषभावनेतून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी मिळाला नाही. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी रोहिणी खडसे यांना मतदान करून विधानसभेत पाठवा. त्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक आहे. मागील काळात रोहिणी खडसे यांनी सतत पाठपुरावा करून जोंधनखेडा येथील कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा प्रश्न मार्गी लावला, हे आपण अनुभवले आहे. त्यांचा पारंबी, हिवरा, जोंधनखेडा, कुऱ्हा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला. नाथाभाऊ यांचा विकासाचा वारसा पुढे नेऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे डॉ. बी.सी. महाजन यांनी आवाहन केले.

यावेळी विशाल महाराज खोले यांनी सांगितले की, कोरोना काळात कुऱ्हा येथे लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारणीसाठी रोहिणी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. सेंटर सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. स्वखर्चातून कोविड सेंटर साठी तीस बेड आणि मास्क औषधे उपलब्ध करून दिले. रोहिणी खडसे या जनतेच्या सुखदुःखात धावून येणाऱ्या सर्वसामान्य उमेदवार असून त्यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करा.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button