शिवकालीन दांडपट्टा आता महाराष्ट्राचे ‘राज्य शस्त्र’, शासनाची शिवजयंतीनिमित्त मोठी घोषणा
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंतीनिमित्त दिली माहिती
Maharashtras weapon : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंतीनिमित्त दांडपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून घोषीत झाल्याची माहिती दिली आहे. दांडपट्टा हे शिवकालीन हत्यार असून, त्याचा वापर हा लढाई तसेच युद्धकला, स्वसंरक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ऐतिहासिक शस्त्र म्हणून वापर नेहमी केला जातो.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दांडपट्टा हे मराठ्यांच्या इतिहासात खोलवर रुजलेले एक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात दांडपट्ट्याची भूमिका आणि महत्त्व पाहता त्याचा सन्मान होणे आवश्यक होते. त्यानुसार तातडीने कार्यवाही करून दांडपट्ट्यास राज्यशस्त्राची पदवी देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सवात दांडपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री मुनगंटीवार देखील उपस्थित होते.
दांडपट्ट्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित
शिवकालीन इतिहास, साधणे आणि तत्कालीन शस्त्रास्त्रांमध्ये दांडपट्ट्याचा उल्लेख आढळतो. रशियन अभ्यासक आणि इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमध्येही दांडपट्ट्याचा उल्लेख आढळतो. दांडपट्टा हे एक घातक शस्त्र आहे, ज्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूवर विशिष्ट अंतर ठेऊन चाल करण्यासाठी केला जात असे. विशेष म्हणजे दांडपट्टा गर्दीच्या वेळी (लढाई) एकाच वेळी अनेकांना गुंतवून ठेऊ शकतो.